Type Here to Get Search Results !

आसाम मंत्रालयात डॉ.निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव तथा आमदार तरंगा गोगोई यांची भेट घेत क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी चर्चा.




मनोज एल खोब्रागडे 

🙏🏻मुख्य संपादक🙏🏻

8208166961/9860020016 


 गुवाहाटी | प्रतिनिधी :आसामचे मुख्यमंत्री यांचे सचिव, आसाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच आमदार श्री.तरंगा गोगोई यांची डॉ.निलेश (दादा) राणे यांनी आसाम मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीत देशातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


बैठकीदरम्यान ग्रामीण व दुर्गम भागातील होतकरू खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे, क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त उपक्रम राबविणे तसेच विविध राज्यांमधील क्रीडा क्षेत्रातील समन्वय वाढविण्याबाबत सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाली.


यावेळी आमदार श्री.तरंगा गोगोई यांनी डॉ.निलेश (दादा) राणे यांच्या क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. 


डॉ.राणे यांनीही गुणवंत खेळाडूंना योग्य व्यासपीठ, मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य मिळावे यासाठी सातत्याने कार्य करण्याची भूमिका मांडली.


सौहार्दपूर्ण वातावरणात झालेली ही भेट भविष्यात क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि युवकांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास दोन्ही मान्यवरांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments