Type Here to Get Search Results !

साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का

 



ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी हॉस्पिटलचे डीन मा. देसाई यांच्याशी फोनवर संवाद साधून योग्य ती काळजी घ्यायाचे दिले निर्देश


मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


नेरुळ :- नेरुळचे LP येथील दोन महाविद्यालयीन मुलींना विजेचा धक्का लागल्याप्रकरणी ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी हॉस्पिटलचे डीन मा. देसाई यांच्याशी फोनवर संवाद साधून योग्य ती काळजी घ्यायला सांगितले.


नेरुळ, नवी मुंबई नेरुळ एल.पी. नाका येथे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागून त्या जखमी झाल्या. सध्या वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटल येथे ऍडमिट असून अतिदक्षता विभागात उपचार चालू आहे.


या प्रकरणी आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी हॉस्पिटलला भेट दिऊन सदरविषयी ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना फोनवर माहिती दिली असता ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी फोर्टिस हॉस्पिटलचे डीन मा. देसाई यांना दोन्ही महाविद्यालयीन मुलींची योग्य ती काळजी घायला सांगितले.


महावितरणच्या प्राथमिक तपासणीत पथदिवे वीजजोडणीच्या केबलचे इन्सुलेशन तुटल्याने ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, संबंधित वीजजोडणी ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या देखभालीखाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी प्रशासनाच्या बेफिकीर कारभारामुळे दोन मुलींचे जीव धोक्यात आल्याचा आरोप करत महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.तसेच महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता (परिमंडळ-१), संबंधित पर्यवेक्षक, कर्मचारी आणि देखभाल ठेकेदाराची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी त्यांनी केली.


यावेळी महिला जिल्हाध्यक्षा शिल्पाताई रणदिवे, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, उपाध्यक्ष गौतम चव्हाण, सतीश खंडाळे आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments