मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- माननीय पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहर विकास, नागरिकांच्या समस्या, पुनर्वसन, आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्था आणि नागपूरच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
नागपूर जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर झालेल्या जिल्हा नियोजन समिती (DPC) बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार मा. श्री. अभिजीत वंजारी यांनी जनहिताचे विविध प्रश्न ठामपणे मांडले.
अतिक्रमण कारवाई, पुनर्वसन, घनकचरा व्यवस्थापन, मालमत्ता कर सवलत, आरोग्य सुविधा आणि शहर विकासाशी संबंधित विषयांवर नागरिकांच्या हितासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याची भूमिका मांडली.
या बैठकीस महापौर श्रीमती निताताई ठाकरे, नागपूर महानगरपालिका आयुक्त श्री. विपिन इटनकर, माजी मंत्री तथा आमदार श्री. नितीन राऊत, पश्चिम नागपूरचे आमदार श्री. विकास ठाकरे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, आमदार संजय मेढे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. पोदार साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
नागपूरकरांच्या हक्कांसाठी आणि शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध.

Post a Comment
0 Comments