Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

सहा ते सात दिवस वीज नसल्याने इंटरनेट सेवा ठप्प; डहाणू तलासरी परिसरातील नागरिकांचे हाल, तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी



अतिवृष्टीचा फटका; वीज खंडित, इंटरनेट बंद, ऑनलाइन कामे ठप्प – महावितरणच्या कारभारावर नागरिकांचा संताप


अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755

पालघर :- पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्याने तलासरी व डहाणू या दोन तालुका मध्ये सलग सहा  ते सात दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. परिणामी इंटरनेट सेवाही पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वीज आणि इंटरनेट सेवा बंद असल्याने अंगणवाडी सेविका, शिक्षक, बीएलओ तसेच ऑनलाइन माध्यमातून काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची शासकीय व इतर ऑनलाइन कामे गेल्या सहा ते सात दिवसांपासून रखडली आहेत. विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन अभ्यासात अडथळे निर्माण झाले असून दैनंदिन व्यवहारांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे.

सततच्या पावसामुळे अनेक भागांत वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असले, तरी महावितरणने युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे करून लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभावित गावांतील वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवा तातडीने सुरळीत करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments