Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर शिस्त,कौशल्य, कष्ट, प्रामाणिकपणा च्या जोरावर यश संपादन करावे. : दिलावर महाडकर



किशोर पितळे 

तळा तालुका प्रतिनिधी 

तळा :- अंजुमन इस्लाम जंजिरा सिद्धी जफर शेख आणि मेमोरियल टेक्निकल इन्स्टिट्यूट मुरुड येथे २ जुलै २६ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यापुढे म्हणाले कि विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे शिक्षण घेत असताना जिध्द उद्दीष्ट बाळगले तर शिक्षण घेणे शक्य होते त्यासाठी शिस्त प्रामाणिकपणा कौशल्य असेल तर यश मिळते. या पुढील विद्यार्थ्यांनी जिध्द बाळगावी असे आवाहनकेले या कार्यक्रमाला अध्यक्ष युनिव्हर्सल एज्युकेशन आणि वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष दिलावर महाडकर प्रमुख पाहुणे उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सन २०२५/२६ शैक्षणिक वर्षात विविध ट्रेड मधून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पारितोषक प्रमाणपत्र देऊन करण्यात आला तसेच विविध क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करून कामगिरी करून संस्थेचे नाव दूर करणाऱ्या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला संस्थेचे चेअरमन समीर दवनाकयांच्यामार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य इम्तियाझ घलटे यांच्या नेतृत्वाखाली संस्था विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच क्रीडा, व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य विकासालाही प्राधान्य देत असल्याचे यावेळी अधोरेखित केले त्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अल्ताफ हुसेन दांडेकर, मतिम मुस्ताक हसवारे, मोहम्मद सईद एस एम उलटे,सलमान शौकत घलटे,तौसिफ इस्माईल फत्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांची यशाची कौतुककरूनउज्वलभविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भविष्य शुभेच्छा दिल्या हा संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण प्रेरणादायी वातावरण पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसलीम अ.सलाम भुरे सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments