किशोर पितळे
तळा तालुका प्रतिनिधी
तळा :-शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कँबिनेट मंत्री ना.भरतशेठ गोगावलेयांच्याहस्ते ५जुलै २६रोजी सांय.४वा.करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर,तालुका प्रमुख प्रध्दुम्न ठसाळ,शहरप्रमुख राकेश वडके,कोअर कमीटी सदस्य लिलाधर खातू, ठाणे टेंभीपाडा शाखा प्रमुख धनंजय बडे विभाग प्रमुख,जिल्हा महिला संघटीका निलिमाताई घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके. सचिन पाटेकर, युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे,
संघटक शिवसैनिक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन व फीत कापून जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यातआले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ना. भरतशेठ गोगावले यांनी सांगितले की, जनसंपर्क कार्यालय हे केवळ पक्ष कार्यालय नसून नागरिकांच्या समस्याऐकूनघेण्यासाठी, शासनाच्यायोजनासर्वसामान्यांपर्यंतपोहोचवण्यासाठी
आणि सातत्यपूर्ण संवादासाठी एक महत्त्वाचे माध्यम ठरेल.नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी पक्ष सदैव कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.धनंजय अशोक बडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, लोकप्रतिनिधींशी थेट संवाद तसेच सामाजिक व विकासात्मक कामांबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.तसेच युवक,महिलाआणि सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी या जनसंपर्क कार्यालयामुळे पक्षसंघटन अधिक मजबूत होईल तसेच नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण अधिक प्रभावी पणे होईल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले.सामाजिक व संघटनात्मक कार्याला नवे बळ देणारे हे जनसंपर्क कार्यालय ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली

Post a Comment
0 Comments