Type Here to Get Search Results !

राजगृहावर आलेल्या विद्यार्थ्यांना युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदमध्ये सामील होऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


दादर :- दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर भाजप सरकारच्या सांगण्यावरून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. देशभरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत.


मुंबईत मोठ्या संख्येने विद्यार्थी राजगृह, दादर येथे उपस्थित झाले असता वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली.


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बंद मध्ये सामील होऊन हा बंद यशस्वी करावा, असे आवाहन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना केले.

Post a Comment

0 Comments