Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने अडीच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले




त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो.9096817953


नागपूर : पार्किंगमध्ये उभ्या

असलेल्या अडीच वर्षाच्या बालकाला भरधाव कारने धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना बेलतरोडी हद्दीत घडली. श्रेअंश पंकज आष्टणकर, असे मृत बालकाचे नाव आहे.


सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेलतरोडी हद्दीतील मनीषनगर येथील पॅनथॉन सोसायटी, आश्रय अपार्टमेंटसमोर ही घटना घडली. दर्शन रामकृष्ण आष्टणकर (वय ३९, रा. तपोवन कॉम्प्लेक्स, जयप्रकाशनगर) यांच्या भावाचे गजानन डेली नीड्स नावाचे दुकान आहे. त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा श्रेअंश हा दुकानासमोरील पार्किंगमध्ये उभा होता. त्याच वेळी तेथे आलेल्या एमएच


४९/ डीडब्ल्यू ६३६८ क्रमांकाच्या कारचालकाने कार निष्काळजीपणे व हयगयीने पुढे नेऊन श्रेअंशला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात श्रेअंश गंभीर जखमी झाला. अपघातानंतर गंभीर जखमी मुलाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात यानंतर पुढील उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments