Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

OBC प्रतीक्षायादी तात्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२६ मधील OBC प्रवर्गाची प्रतीक्षायादी (Waiting List) अद्याप जाहीर न झाल्याने अनेक पात्र व गुणवंत उमेदवारांचे भविष्य अनिश्चित झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील युवक-युवतींनी कठोर परिश्रम करूनही केवळ प्रशासकीय विलंबामुळे नियुक्तीपासून वंचित राहणे ही गंभीर बाब आहे.


यासंदर्भात मंत्रालयात मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन OBC प्रवर्गाची प्रतीक्षायादी तात्काळ जाहीर करावी आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.


राज्यातील प्रत्येक गुणवंत युवक-युवतीला न्याय मिळावा, त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळावे आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे, यासाठी हा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहील.

Post a Comment

0 Comments