मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
गडचिरोली :- माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती प्रदान करण्यात आली. मुंबई येथे मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते आयोजित पिपिंग समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला.
पदोन्नतीप्राप्त अधिकारी:
• सपोनि. योगीराज जाधव
• सपोनि. सचिन झनक
• सपोनि. बाबासाहेब दुधाळ
• सपोनि. सुनील बागल
• सपोनि. राहुल देव्हडे
ही पदोन्नती त्यांच्या समर्पण, शौर्य आणि उत्कृष्ट सेवेला मिळालेली योग्य दाद असून, संपूर्ण गडचिरोली पोलीस दलासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
सर्व पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments