Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची मत्स्य शेती व भात शेतीला क्षेत्रभेट




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


झरी, दि. १ ऑगस्ट २०२६ :

ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, झरी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या मा. सि. बस्तीयान फर्नांडिस यांच्या पुढाकाराने तसेच स्थल भेट समिती प्रमुख श्री. अमित मालकरी व श्रीमती सरिता पर्हयाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मत्स्य शेती व्यवसाय व भात शेतीची प्रत्यक्ष माहिती घेतली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता, सहभागात्मक व्यवस्थापन व व्यावहारिक ज्ञानवृद्धीसाठी शाळेत विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत स्थल भेट समितीच्या माध्यमातून आनंदी शनिवारचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शाळा परिसरातील शेतीची प्रत्यक्ष भेट देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी भात शेतीतील लावणी प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच जवळच असलेल्या शेततळ्याला भेट देऊन मत्स्य व्यवसायाची माहिती जाणून घेतली. शेती व ग्रामीण व्यवसायातील विविध पैलू विद्यार्थ्यांनी समजून घेतले.

या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना निसर्ग, शेती व ग्रामीण जीवनाशी जोडणारा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. सहभागी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा आनंद घेत आपल्या अनुभवांचे कथन केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments