Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

उमरेड तालुक्यामध्ये तहसिल कार्यालयातील आधार केंद्राकडून नागरीकांना त्रास होत असल्याने उमरेड शहरात किमान दोन आधार केंद्र ताबडतोब सुरू करण्यात यावे.



त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953

उमरेड. माननीय अनुप खांडे साहेब उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नागपूर यांना चंद्रशेखर बावनकुळे शिवसेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष नागपूर यांच्या तर्फे 

सविनय निवेदन देण्यात येत आहे की, उमरेड तालुका येथील लोकसंख्या अंदाजे एक ते दोन लाखाच्या जवळपास आहे. माझे माहीतीप्रमाणे उमरेड शहरात फक्त एक आधार केंद्र तहसिल कार्यालयात सुरू असल्याचे निर्देशनास आले आहे. लोकसंख्या लक्षात घेता उमरेड शहरात आधार केंद्राची संख्या दोन- तीन आवश्यक आहे. आणि आधी दोन-तीन केंद्र उमरेडमध्ये असल्याचे माहीती आहे. उमरेडमध्ये बाहेरगावववरून येणार-जाणा-यांची संख्या जास्त असल्याने ग्राहक रोज सकाळी ७ ते ८ वाजेपासून नंबर लावनेकरीता तहसिल कार्यालयातील आधार केंद्रात चक्करा मारत असल्याचे व सकाळी येवून सुध्दा नंबर लागत नसल्याने वारंवार निराश होवून परत जावे लागत असतात. शहरात एकच आधार केंद्र असलयाने लोकांच्या समस्याचे निराकरण होत नसल्याचे निर्दशानास येत आहे. येथील केंद्रात नवीन लहान मुलांना, अपंग व्यक्ती, वयवृध्द ग्राहकांना सुध्दा नंबर लावण्यास भाग पाडत असतात अश्या भरपूर तकारी माझया कार्यालयात येत असतात.

तसेच तहसिल सेतू केंद्राभोवताल दलाल नेमले असल्याचे व त्यांच्या मार्फत आधार फॉर्म प्रिंट चे १० रू, फॉर्म भरण्याचे ५० ते १००, राजपत्राचे १५००/- २०००/- २५०० जसे मनात आले तसे पैसे उकळण्याचे काम या कार्यालयाच्या भोवताल होत असल्याचे लक्षात येत आहे. नावात बदल करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे असूनसुध्दा (उदा. लग्नानंतरचे नावात बदल करण्याकरीता बारकोड असलेली विवाह प्रमाणपत्र, लहान मुलांच्या नावात बदल करण्याकरीता जन्म दाखला असून सुध्दा ग्राहकांना राजपत्राची मागणी करत असतात व ते राजपत्र आपल्या स्वतः च्या केंद्रातूनच कांढलेले असले पाहीजे अशी सुध्दा मागणी असते. तसेच १८ वर्षावरील नवीन आधारकार्ड, बदल करण्याकरीता ग्राहकांना नागपूरला जाण्याचा सल्ला सुध्दा देण्यात येतो.) असे सर्व प्रकार सतत सुरू असून यात काही अधिकारी वर्ग सुध्दा यावर दुर्लक्ष करत असल्याचे निर्देषनास येत आहे


करीता लवकरात लवकर सदर केंद्राची चौकशी करून उमरेड शहरात किमान दोन आधार केंद्र सुरू करण्यात यावे

Post a Comment

0 Comments