Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

रिफ्लेक्टर नसलेल्या दुभाजकाचा पुन्हा बळी? शिवाजी चौकात 18 चाकी ट्रकचा भीषण अपघात

 


सिंदेवाहीत मोठी दुर्घटना टळली! 18 चाकी ट्रक दुभाजकावर चढला; चालक बचावला 


सिंदेवाही शहरातील शिवाजी चौकात शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दगडी कोळसा खाली करून परत येणारा MH 40 CT 2090 क्रमांकाचा 18 चाकी ट्रक दुभाजक न दिसल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या मधील दुभाजकावर चढला.


अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या पुढील आणि मागील बाजूचे टायर फुटले, तर संपूर्ण ट्रक अर्धवट हवेत लटकलेल्या अवस्थेत अडकून राहिला. सुदैवाने ट्रकमध्ये चालक एकटाच होता आणि तो या अपघातातून सुखरूप बचावला. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.


घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही काळ शिवाजी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.


स्थानिक नागरिकांच्या मते, दुभाजकावर रिफ्लेक्टर प्लेट नसल्यामुळे हा अपघात घडला. यापूर्वीही याच ठिकाणी रेतीने भरलेला हायवा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दुभाजकावर रिफ्लेक्टर बसवून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी 

जन संवाद न्युज चंद्रपूर सिंदेवाही

Post a Comment

0 Comments