गुरुनाथ तिरपणकर
✍🏻मुंबई प्रतिनिधी ✍🏻
मो. 9323662619
खारेपाटण :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयातील विद्यार्थ्यीनी रोज ७-८किमी अंतर चालत येतात, त्या विद्यालयातील गरीब गरजू,होतकरु मुलींना रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिमेच्या वतीने सायकल वाटप करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ खारेपाटण(मंडल-३१७०) आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण व परिसरातील१०होतकरु मुलींना नवीन सायकलचे वाटप करण्यात आले.सायकलींगचे वाटप झाल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य सगळ काही सांगून गेले.या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष रो.मंगेश ब्रम्हदंडे,मानद सचिव रो.सुबोध देसाई, खजिनदार रो.शर्मिन काझी, उपक्रम प्रमुख-संस्थापक अध्यक्ष रो.दयानंद कोकाटे,प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री.संजय सानप सर, पर्यवेक्षक श्री.संतोष राऊत सर,रो.प्रियेशा अमृते,रो.लक्ष्मीकांत हरयाणा तसेच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मानद सचिव रो.दत्ता कडुलकर, माजी अध्यक्ष रो.श्रीपाद कुलकर्णी, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर याप्रसंगी उपस्थित होते.तसेच या उपक्रमासाठी रो.अजय गुरसळे यांचेही सहकार्य लाभले.रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिमचे माजी अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी समुपदेशनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना कर्तव्यदक्ष असे बहुमोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यीनींचे पालकही उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments