Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मा. स्थायी समिती सभापती सौ. मनस्वी गिऱ्हे यांच्या हस्ते मनपात ध्वजारोहण




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016

चंद्रपूर, १४ ऑगस्ट: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, आज शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित विशेष सोहळ्यात मा. स्थायी समिती सभापती सौ. मनस्वी गिऱ्हे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीपर वातावरणात पार पडले.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी आकाशात तिरंगी फुगे सोडून उपस्थितांनी स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला. या सोहळ्यात बोलताना सभापती सौ. मनस्वी गिऱ्हे यांनी,"देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांचे स्मरण ठेवणे आणि शहराच्या आर्थिक व सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे," असे प्रतिपादन केले.

या सोहळ्याला उपमहापौर श्री.प्रशांत दानव, नगरसेविका सौ.श्रुती घटे,सौ.श्वेता तोतडे,उपायुक्त श्री. संदीप चिद्रावार, उपायुक्त श्री. शेषराव टाले, शहर अभियंता श्री. रवींद्र हजारे, मुख्य लेखापरीक्षक श्री. मनोज गोस्वामी, सहायक आयुक्त श्री. अनिलकुमार घुले, नगर सचिव श्री. संतोष गर्गेलवार, नगर रचनाकार कुशल कडू देशमुख तसेच  मनपाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments