Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

महाराष्ट्रातील जल जीवन मिशन २.०च्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण बैठक




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 

चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की खासदार प्रतिभाताई धानोरकर या केंद्रीय जलशक्ती मंत्री मा. श्री. सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील जल जीवन मिशन २.०च्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली.

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जल जीवन मिशनची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे प्रलंबित कामांचा आढावा घेऊन त्यातील अडचणी तातडीने दूर कराव्यात आणि केंद्र व राज्य शासनाने समन्वयाने कामांना गती द्यावी, अशी मागणी यावेळी केली. नागरिकांना त्यांच्या हक्काचा नियमित आणि शाश्वत पाणीपुरवठा मिळणे आवश्यक असून, त्यासाठी आवश्यक कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत चर्चा केली.

बैठकीस महाराष्ट्रातील खासदार तसेच केंद्र व राज्य शासनाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments