मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या सुपीक शेतजमिनींवर प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या तीव्र असंतोषाची दखल घेत जिल्हाधिकारी मा. वसुमना पंत मॅडम यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान, गोंडपिपरी तालुक्यातील गावातील सुपीक जमिनींचे संपादन थांबवणे, फेरफार व वारस नोंदी पूर्ववत करणे आणि खरेदी-विक्रीसह शेतीविषयक व्यवहारांमधील अडचणी तात्काळ दूर करण्याबाबत सविस्तर चर्चा करून औद्योगिक कृषी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांचे हित व हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेऊन जमीन संपादन प्रक्रियेला स्थगिती देण्याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांच्या वतीने खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी केली.

Post a Comment
0 Comments