Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

लेकीचे रक्षण करणाऱ्याच पित्याचा दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार.या घटनेने माणुसकीच हादरली .



तळा -किशोर पितळे- (प्रतिनिधी)

रायगड च्या तळा तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. विकृत मनोवृत्तीच्या या नराधम वडीलांनी आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.पीडित मुलींपैकी एकीचे वय अवघे १४ वर्षे,तर दुसरी फक्त ११ वर्षांची आहे.सदरची घटना २०आँगस्ट रोजी माणगांव पोलीस ठाणे हद्दीत घडली असून माणगांव ठाण्यात हा धक्कादायक गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. कामानिमित्त हे कुटुंब बाहेर मोलमजुरीसाठी जात असत तळा,म्हसळा,सातारा,कशेणे माणगांव अशा विविध ठिकाणी या नराधमाने बाळाराम मनोहर जाधव पढवण ता.तळा २०२४ते जून२०२६ म्हसाडी तळा स्वतः च्या अल्पवयीन दोन्ही पिडीत मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन वांरवार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या वर जबरदस्ती ने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या आईने केली आहे.आपल्या मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. प्रकरण समोर येताच पोलिसांनी आरोपी असलेल्या या विकृत वडीला ला अटक केली आहे.त्याच्याविरोधात

गुन्हा रजी.नं. २४१/२०२६; ३७५,३७६,३७६,(अ) ३७६(ब)५०६(२)बाल लैंगिक अत्याचार संरक्षण पोस्को अधिनियम२०१२_३,४,५(i)५(m)५(n)६भा.न्या.स.कलम.६३,६४,६५,(१) ६५(२)३५१ (३)प्रमाणे POCSO कायद्यातील कलम  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईत ASI निमकर यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल शिर्के, विष्णु तिडके आणि दहिफळे यांनी या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत पवार आणि पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शना खाली माणगांव पोलीस अधिक तपास करीत  आहेत

Post a Comment

0 Comments