मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- नागपूर महानगरपालिका व नागपूर शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल (कच्छी विसा) मैदान येथे उभारण्यात आलेल्या स्मार्ट पोलीस चौकीचे लोकार्पण केले. आधुनिक सुविधांनी सुसज्ज ही स्मार्ट पोलीस चौकी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर नीताताई ठाकरे, आ. कृष्णा खोपडे जी, मनपा सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, उपमहापौर लीलाताई हाथीबेड, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, नगरसेविका अर्चनाताई पडोळे, संतोषदेवी लड्ढा, महेश्वरीताई बिसेन, निलेश गायधने, अरुण हारोडे, सुनील हिरणवार, शकील पटेल, दीपक देवशिंघानी, देवेंद्र मेहेर, प्रमोद पेंडके, किशोर पाटील यांच्यासह अन्य मान्यवर, नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments