Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

शिवसेना (उ. बा. ठा.) गटाला मोठा धक्का! एटापल्ली तालुक्यातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश



विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला असून, तालुका प्रमुख अक्षय भाऊ पुंगाटी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उ. बा. ठा.) गटातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला.

गडचिरोली येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उद्योग व सांस्कृतिक मंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. उदय सामंत साहेब, गडचिरोली जिल्ह्याचे सहपालक मंत्री मा. ना. ऍड. आशिष जयस्वाल साहेब, शिवसेना सचिव तथा आमदार डॉ. मनीषाताई कायंदे, पूर्व विदर्भ संघटक मा. किरण भाऊ पांडव, महिला संपर्क प्रमुख सौ. वर्षाताई मोरे, सहसंपर्क प्रमुख गडचिरोली श्री. हेमंत जंबेवार, शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली श्री. राकेश बेलसरे तसेच अहेरी विधानसभा प्रमुख श्री. संदीप कोरेत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर पक्षप्रवेश पार पडला.

शिवसेना पक्षाचे मुख नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एटापल्ली तालुक्यातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे एटापल्ली तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.

यावेळी अक्षय पुंगाटी, तालुका प्रमुख शिवसेना (उ. बा. ठा.), नामदेव हिचामी, शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक न. पं. एटापल्ली, कैलास उसेंडी, सरपंच ग्रामपंचायत गुरुपल्ली, बाळू भाऊ आत्राम, उपसरपंच ग्रामपंचायत गुरुपल्ली, श्रीमती राजश्री ताई जांभूळकर, तालुका महिला आघाडी संघटिका, महादेव हिरा, उपशहर प्रमुख, प्रशांत तलांडे, तालुका संघटक, रुषभ दुर्गे, विधानसभा प्रसिद्धी प्रमुख, नत्तू दुर्वा, शाखा प्रमुख कृष्णार, सुमित करमरकर, युवासेना तालुका प्रमुख यांच्यासह सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेशामुळे एटापल्ली तालुक्यात शिवसेना (शिंदे गटाची) संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून, आगामी काळात तालुक्यात शिवसेनेची नवी राजकीय वाटचाल सुरू होणार असल्याचे संकेत या निमित्ताने मिळाले आहेत.

Post a Comment

0 Comments