व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
9209982212
अहेरी :- अहेरी सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन तथा समाज कल्याण विभाग, गडचिरोली अंतर्गत वांगेपल्ली येथील निवासी शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका डांगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर निवासी शाळेपासून मुलींच्या वसतिगृहापर्यंत बँडच्या तालावर रॅली काढण्यात आली. मुलींच्या वसतिगृहातही मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका डांगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा देशभक्तीपर घोषणांनी वांगेपल्ली परिसर दणाणून गेला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून व्यसनमुक्ती तालुका समन्वयक मा. नंदिनी आशा, देवलमरी ग्रामपंचायत सदस्य तथा गडचिरोली जिल्हा राम राम महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मा. सालय्या कंबलवार उपस्थित होते. तसेच शिक्षक सीमा वनकर, विद्या दहागावकर, श्वेता येगलोपवार, सुप्रिया अलम, यश पडालवार, उमेश मडावी, शिरिन येमुलवार व सुरज येमुलवार यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका डांगेवार व सालय्या कंबलवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले तसेच भाषण स्पर्धेत उत्साहाने सहभागी होऊन आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलेश कोटा यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्या दहागावकर यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व क्रिस्टल कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments