मुंबई महानगर प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
मो. 9323662619
रायगड :- देशभरात १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, स्थानिक कुमशेत गाव कमिटीचे पदाधिकारी झेंडावंदनासाठी उपस्थित असतात.त्याच अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद शाळा,ता.माणगाव येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.कुमशेत महिला हितवर्धक मंडळ आणि जनजागृती सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कुमशेत महिला हितवर्धक मंडळाच्या सदस्या तसेच जनजागृती सेवा संस्थेच्या सक्रिय सदस्या सौ.संजीवनी चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी रायगड जिल्हा परिषद कुमशेत शाळेचे चंद्रकांत मधुकर साळुंखे, अजित गोपाळ, सुनिल कडू, मंगला आत्माराम भोसले, पूर्ण कुमशेत गाव कमिटीचे अध्यक्ष जनार्दन कडु आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी अबराम दळवी, संतोष चंद्रकांत कडु,आनंद दळवी, संतोष कडु,चेतन कडु, अंगणवाडीच्या सौ.शोभा कडु,सौ.शर्मिला बबन दाभेकर,कुमशेत महिला हितवर्धक मंडळाच्या सदस्या तसेच जनजागृती सेवा संस्थेच्या सक्रिय कार्यकर्त्या संजीवनी चव्हाण, निकिता दळवी, सरिता चव्हाण,माधुरी कडु, रुपाली कडु या उपस्थित होत्या.आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दृढ झाला.यावेळी आदीवसी पालक वर्ग आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेतील शिक्षक श्री.अजित लाड यांनी केले.

Post a Comment
0 Comments