Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पक्ष संघटन बळकट करण्यावर खासदार प्रफुल पटेलजींचा भर



✍️ भवन लिल्हारे भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847 /8888519894

भंडारा : ( २० जुलै २०२६ ) खासदार श्री प्रफुल पटेलजी दोन दिवसीय भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, आज शासकीय विश्रामगृह, भंडारा येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला  तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या व निवेदन स्वीकारून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर त्यांनी विशेष जोर दिला. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, जनसामान्यांशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि पक्षाची विचारधारा व ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन खासदार श्री प्रफुल पटेलजी यांनी केले.

यावेळी सर्वश्री खासदार राजेंद्र जैन, आमदार राजूभाऊ कारेमोरे, जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, देवेंद्रनाथ चौबे, महेंद्र गडकरी, राजू हेडाऊ, हेमंत महाकाळकर, जगदीश निंबार्ते, नरेंद्र झंझाड, उमेश तुरकर, लक्ष्मी सावरकर, सरिता ताई मदनकर, यशवंत सोनकुसरे, रजनीश बनसोड, राजू पटेल, लोमेश वैद्य, विजय सावरबंधे, बालूभाऊ चुन्ने, राजू माटे, मनीष वासनिक, राहुल निर्वाण, गणेश चौधरी, अमन मेश्राम, जवाहर निर्वाण,  हितेश सेलोकर, एड. नेहा शेंडे, मंजुषा बुरडे, कीर्ती गणवीर, आरजू मेश्राम, रुपेश खवास, रिंकू शर्मा, कृष्णा उपरीकर, सदाशिव ढेंगे, आनंद मलेवार, महादेव पचघरे, जगदीश ऊके, भूपेंद्र नागफासे, राजेश वासनिक, अमर उजवणे, प्रशांत देशकर, महेंद्र वाहने, सरोज भुरे, रुपेश टांगले, रत्नमाला चिटूले, सुनीता उपरीकर, राजेश डोरले, जितेंद्र बोंद्रे, राकेश राऊत, विजुभाऊ खेडीकर, मुकेश बावनकर, विजय पारधी, मेहमूदभाई, अंबादास मंदुरकर, रवींद्र पवनकर सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments