त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो.9096817953
साकोली :- नशामुक्त भारत अभियान अंतर्गत शिलवंत बहुुउद्देशिय विकास संस्था जाख द्वारा संचालित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोलीच्या वतीने वनवैभव आदिवासी प्राथ. माध्यमिक, व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कोका (जंगल) येथे दि. 18/08/2026, रोजी व्यसनमुक्ती व उपचार मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून, मार्गदर्शनाला सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष मा. गंगाधर धुवाधपारे सर यांनी चांगल्या गोष्टींचे नेहमी व्यसन करा, पण चुकीच्या गोष्टींचे किंवा अमली पदार्थांचे व्यसन नको याबद्दल मार्गदर्शन केले. मा. उषा घोडेस्वार (प्रकल्प संचालिका उज्वल व्यसनमुक्ती केंद्र, साकोली) यांनी व्यसनामुळे होणारे विविध दुष्परिणाम समजावून सांगून दारूमुळे होणारे आजार किती गंभीर स्वरूपाचे असतात व व्यसनमुक्तीसाठी काय उपचार केले जावे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उज्वल व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापक मा. शिलवंत घोडेस्वार सर यांनी उपस्थित सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन , ना मी नशा करणार, ना कुणाला करू देणार, नशा जीवनाची करी दुर्दशा, सोडा व्यसनभक्ती करा व्यसनमुक्ती अशी घोष वाक्य दिली. शाळेचे मुख्याध्यापक मा. कमलेश सार्वे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनातून विद्यार्थ्यांना स्वकथन करून व्यसनाबद्दल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. नितीन बुराडे सर, मा. ओमप्रकाश कानेकर सर, मा. गोबाडे सर, मा. चव्हाण सर, मा. गायकवाड सर, मा. रेहपाडे सर, मा. प्रदीप सार्वे सर, मा. भडके मॅडम, मा. पडोळे मॅडम व ३०० हून अधिक विध्यार्थी व संपूर्ण कर्मचारी गण उपस्थित होते. या मार्गदर्शनाला शिक्षक व विध्यार्थांचे अतिशय सकारात्मक सहभाग लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. कानेकर सर यांनी अतिशय उत्कृष्ठरित्या केले, तसेंच उपस्थितांचे आभार मा. भडके मॅडम यांनी व्यक्त केले.
सर्व मान्यवर व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत हा जनजागृती कार्यक्रम अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडला.

Post a Comment
0 Comments