Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अवैध धंदे बंद करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनाजी वि. जळक पोलीस निरीक्षक उमरेड दिले निवेदन.



त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो.9096817953

उमरेड :- उमरेड पोलीस ठाणे उमरेड शहर / ग्रामीण विभागात गुन्हेगारी व अवैद्य धंदयात सतत वाढ होवुन कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याबाबत दिलेला विषयांकीत तकार अर्ज मा. मुख्यमंत्री सा. म.रा. मुंबई यांचे सचिवालय हैद्राबाद हाउस नागपुर येथे दिल्याने सदर तकार अर्ज आमचे वरी ठ अधिकारी यांचे कार्यालयाचे मार्फतीने पोलीस स्टेशन उमरेड येथे कार्यवाही करीता प्राप्त झाला आहे.

पोलीस ठाणे उमरेड शहर / ग्रामीण भागात गुन्हेगारी, अवैद्य धंदयावर प्राप्त गुप्त माहीतीचे आधारे सन 2025 ते माहे जुलै / 2026 या कालावधीत अवैद्य धंदयावर वारंवार छापा टाकुन दारूबंदी-341, जुगार-58, रेती चोरी-35, तंबाखु-06, एन.डी.पी.एस. कायदा- 50 कारवाई करून गुन्हे नोंद करण्यात आले आहे. तसेच वारंवार अवैद्य दारू विकी करणारे एकुण 65 इसमावर कलम 93 मदाका तसेच गुन्हयावर प्रतिबंध करण्यास क. कलम 126 बी.एन.एस.एस.-561, कलम 129 बी.एन.एस.एस.-115, कलम 56 मपोका- 28. एम.पी.डी.ए.-01, अशाप्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे.

पोलीस ठाणे उमरेड शहर / ग्रामीण भागात गुन्हेगारी, अवैद्य धंदयावर प्राप्त माहीतीचे आधारे गुन्हेगारावर जास्तीत जास्त प्रमाणात कार्यवाही करून त्यांचेवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. उमरेड शहर व ग्रामीण भागात चो-याचे प्रमाणावर प्रतिबंधक करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात पेट्रोलींगचे प्रमाण वाढविण्यात आले असुन वेळोवेळी नाकाबंदी व रेकॉर्ड वरील गुन्हेगार यांचेवर पाळत ठेवुन त्यांना तपासण्यात येत आहे. तसेच वाहतुक अमंलदार यांचेकडून निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालविणा-यावर मोवाका अंतर्गत जास्तीत जास्त प्रमाणात कार्यवाही करवुन घेण्यात येत असुन भविष्यात सुध्दा कार्यवाही करीत राहणार आहोत. पोलीस ठाणे उमरेड शहर / ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरीता आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत. याची दक्षता घेतली आहे.

Post a Comment

0 Comments