मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
यवतमाळ :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की दारव्हा तालुक्यातील दहेली येथे कुपटी नदीवरील पुरात वाहून गेल्यामुळे आर्णीतील लोणी येथील रहिवासी असलेल्या माधवी खंडारे व त्यांच्या दोन चिमुकल्या कन्या साची व प्राची यांचे दुःखद निधन झाले. या घटनेची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी तातडीने
दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन शोकाकुल कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. तसेच या कठीण प्रसंगी त्यांना धीर दिला.
तद्नंतर संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. बाधित कुटुंबाला शासनाकडून नियमानुसार सर्वतोपरी मदत तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Post a Comment
0 Comments