Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

वीर बाबुराव शेडमाके स्टेडियम, दाताळा च्या अंदाजपत्रक व आराखड्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 

चंद्रपूर :- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मा. प्रधान सचिव श्री. रणजीत सिंह देवल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात वीर बाबुराव शेडमाके स्टेडियम, दाताळा च्या अंदाजपत्रक व आराखड्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

येत्या 10 दिवसांत सदर जमीन MHADA कडून क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच सुमारे ₹137 कोटींच्या प्रस्तावित स्टेडियमसाठी यापूर्वी उपलब्ध ₹85 कोटींच्या निधीसह आवश्यक अतिरिक्त निधीचा समावेश करून प्रशासकीय मान्यता देण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.

प्रस्तावित स्टेडियममध्ये कबड्डीची मैदाने, बॅडमिंटनचे कोर्ट, बास्केटबॉलची मैदाने, रेसलिंगसाठी सुविधा, एसी सुविधा, सोलर, पार्किंग यांसह तब्बल 5,000 प्रेक्षक क्षमतेच्या अत्याधुनिक क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे.

चंद्रपूरच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख आणि युवा खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे!

Post a Comment

0 Comments