Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

समाजसेविका शीतलताई बलराम सोमनानी यांनी पाच वर्षांचे संपूर्ण मानधन गरजूंना केले प्रधान.



शीतलताई सोमनानी, गौरी सोमनानी यांचा आदर्श ठेवून लोकसेवा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

गडचिरोली =वैरागड : लोकप्रतिनिधीचे पद हे केवळ अधिकाराचे किंवा प्रतिष्ठेचे माध्यम नसून जनसेवेचे प्रभावी साधन आहे, मागील पाच वर्षांपासून संपूर्ण मानधन गरजवंत आणि गरजूंना अर्पण करून  प्रेरणादायी आदर्श वैरागड ग्रामपंचायत  सदस्या शीतलताई बलराम सोमनानी व गौरी सोमनानी यांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे. 

वैरागड ग्रामपंचायत सभागृहात आयोजित ग्रामसभेत शीतल सोमनानी यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारे मानधन हे जनतेच्या सेवेतच उपयोगी पडावे, समाजात आज अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. शिक्षण, आरोग्य, उपजीविका आणि इतर आवश्यक बाबींसाठी मदतीची गरज असलेल्या नागरिकांना शक्य तेवढी मदत करणे हीच खरी लोकसेवा आहे. लोकप्रतिनिधीचे पद आणि त्यातून मिळणारे मानधन हे जनतेच्या विश्वासामुळे मिळते त्यामुळे त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी व्हावा, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील संपूर्ण मानधन गरजू नागरिकांसाठी खर्च करण्याचा निर्णय आपल्या मार्गदर्शनातून जाहीर केले.  

‘जनसेवा हीच खरी लोकसेवा’ हा संदेश आपल्या कृतीतून देणाऱ्या शीतलताई सोमनानी व गौरी सोमनानी यांच्या या सामाजिक उपक्रमाचे वैरागड आणि परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.वैरागड येथे मोलाचे मार्गदर्शन करताना समाजसेविका शीतलताई बलराम सोमनानी व गौरी सोमनानी यांनी ग्रामपंचायत सभागृहात आवर्जून उपस्थित होते तर परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments