Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यासाठी मी IAS होणारच भामरागड येथे कार्यशाळा संपन्न.



संचालक प्रा, डॉ, नरेशचंद्र काठोळे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.

 मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

भामरागड :-  मी आयएएस होणारच! या कार्यशाळेसाठी (मिशन करिता) प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस यांनी नुकतेच भामरागड तालुक्यातील अनेक आश्रमशाळेत कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

      यावेळी कार्यक्रमाचे संयोजक नंदू भाऊ नरोटे सरसेनापती आदिवासी विद्यार्थी संघटना, नागेश मडावी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट)अहेरी तालुका अध्यक्ष, सुरेंद्र भाऊ अलोणे सामाजिक कार्यकर्ते तसेच इंदरशहा मडावी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे भामरागड तालुकाध्यक्ष हे भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम, ताडगाव, भामरागड, लाहेरी येथे उपस्थित होते.

      होतकरू व हुशार ( टॅलेंटेड) विद्यार्थ्यांना स्कूल बॅग सोबत शैक्षणिक साहित्याचे किट, सामान्य ज्ञान व स्पर्धा परीक्षेचे पुस्तक भेट देण्यात आले. या वेळी विध्यार्थी, विध्यार्थीनी,समाज कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments