Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

उमरेड-पवनी-करांडला वन्यजीव अभयारण्य, करांडला गेट व अभयारण्याच्या प्रवेशद्वारावरील फलकांवर मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा.




त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953


उमरेड.वनपरिक्षेत्र अधिकारी उमरेड वन्यजीव आरती उके मॅडम यांना चंद्रशेखर बावनकुळे 

जिल्हाप्रमुख वैद्यकीय मदत कार्य नागपूर ग्रामीण देण्यात आले निवेदन.

करांडला गेट व अभयारण्याच्या प्रवेशद्वारावरील फलकांवर मराठी भाषेचा समावेश करण्याबाबत.

 उमरेड-पवनी-करांडला वन्यजीव अभयारण्यातील करांडला गेट येथे नुकतेच नवीन प्रवेशद्वार व नामफलक उभारण्यात आले आहेत. मात्र, सदर फलकांवरील गेटचे नाव तसेच अभयारण्याचे नाव केवळ इंग्रजी भाषेत लिहिण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असून, शासकीय कार्यालये, शासकीय फलक व सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेला प्राधान्य दिले जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, पर्यटक आणि मराठी भाषिकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित फलकांवर मराठी भाषेत ठळकपणे 'उमरेड-पवनी-करांडला वन्यजीव अभयारण्य' तसेच 'करांडला प्रवेशद्वार' अशी नावे नमूद करण्यात यावीत. आवश्यक असल्यास मराठीसोबत इंग्रजी भाषेचाही समावेश करण्यात यावा.

त्यामुळे आपण या बाबीची दखल घेऊन संबंधित फलकांमध्ये आवश्यक बदल करून मराठी भाषेचा समावेश करावा,

Post a Comment

0 Comments