मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद नागपूर , वन विभाग, ग्रीन फाउंडेशन नागपूर व इतर संबंधित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने नागपूर शहरात ५ लाख आणि नागपूर जिल्ह्यात ५ लाख वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हिवरी नगर येथे मनपाच्या मा. वैद्यकीय आरोग्य सभापती श्रीमती मनिषा अतकरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी मा. वैद्यकीय आरोग्य सभापती श्रीमती मनिषा अतकरे, नगरसेवक श्री. हरेश्वर (बालू) रारोकर, नगरसेविका श्रीमती अर्चनाताई पडोळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरी घरत, एम.एस.यू.चे संवाद तज्ज्ञ श्री. स्नेहल करंजेकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments