Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

माध्यमिक विद्यालय धारशेरी येथे ॲक्युप्रेशर मार्गदर्शन कार्यक्रम



✍️श्री. निलेश सोनवणे ✍️

जळगांव जिल्हा प्रतिनिधी 

धारशेरी : माध्यमिक विद्यालय धारशेरी येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जागृतीसाठी ॲक्युप्रेशर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना ॲक्युप्रेशर उपचार पद्धती, शरीरातील विविध दाब बिंदू आणि त्यांचा आरोग्यासाठी होणारा उपयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात श्री. धनराज मोतीराय सर व डॉ. प्रवीण सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना ॲक्युप्रेशरविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शरीरातील विविध दाब बिंदूंची माहिती देत त्यांचे महत्त्व व उपयोग प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाचा लाभ घेतला.

या उपक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षक श्री. निलेश सोनवणे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुधाकर पाटील सर यांनी प्रभावीपणे केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मयूर पाटील यांनी आभार प्रदर्शन करून मार्गदर्शक तज्ज्ञांचे, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

विद्यालयात राबविण्यात आलेल्या या आरोग्यविषयक उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments