Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.



तळा-किशोर पितळे- (प्रतिनिधी) 

तळा :- सार्वजनिक बांधकाम विभाग माणगांव येथे अनेक वेळा ग्रुप ग्रामपंचायतमहागांवच्यामाध्य मातून रस्ता दुरुस्ती बाबत पत्र व्यवहार केलाअसुन मा.उपविभागीय बांधकाम अधिकारी साहेब यांनी चक्क तोंड, डोळे,बंद करून कानावर हात ठेवल्या ची भुमिका स्विकारली असल्या चे निदर्शनास येत आहे महागांवपंचक्रोशी तील विनवली फाटा ते कोरखंडा फाटा या रस्त्या ची अतिशय दुरावस्था झाली असूनअक्षरशः चाळण झालीआहे. विनवली,बहुलेवाडी,महागांवआदिवासीवाडी,बारपे,महुरे,कोरखंडा,म्हसाडी, कारवीने अशी पुढील गावे असून सदर रस्त्याची चाळण झाली आहे याबाबत अनेक वेळा पंचायत समिती तळा व उप विभागीयबांधकाम अधिकारीमाणगांव यांच्याशी मागील ३वर्षे पत्र व्यवहार केला परंतु त्याला केराची टोपली दाखवली असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.अखेर पंचक्रोशी तील संतप्त ग्रामस्थांनीग्रुपग्रामपंचायत महागाव येथे दि.२४आँगस्ट २०२६ च्या ग्रामसभेमध्ये प्रशासक पुष्पा नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करताना  बांधकाम विभागावर धरणे आंदोलन करण्याचा एकमुखी ठराव केला आहे.या मार्गावर इंदापूर कोरखंडा एस् टी जात असून अनेक वेळा रस्त्या मुळे बंद केली जाते. त्यामुळे विद्यार्थी, प्रवाशाचे हाल होत असतात तसेंच रस्ता खराब असल्या मुळे टेम्पो किंवा इतर वाहने यांना खड्डे वाचवण्या साठी तारेवरची कसरत करावी लागत आहे खाजगी गाडी भाडे दुपट्ट देऊन ही वेळेला येत नाही. एखादी गर्भवती महिलेची डिलीव्हरीला किंवा आजारी पेशंटला वयोवृद्धांना सुद्धा उपचारासाठी नेताना हालत होत आहे.अशा खड्ड्या तून दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यावर सतत किरकोळ अँक्सीडेन्ट चे प्रमाण वाढत आहेतसेंच आगामी गणपती सण येऊन ठेपला असून गणपती आगमन खड्डयातून होणार कि काय?तसेच सणा निमित्ताने येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागेल.हा राष्ट्रवादीचाबालेकिल्ला असलेल्या भागाला वाली कोण? असा संताप व्यक्त केला जात आहे. येत्या ८ दिवसात बांधकाम खात्याने दुरुस्ती केली नाही तर खड्डे भरणे आंदोलनचा इशारा दिलाअसून जो पर्यंत खड्डे भरत नाहीत तो पर्यंत आंदोलन चालू राहील असा ही ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments