Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

एटापल्ली पोलिसांची कारवाई; दोन वाहन जप्त; पसार आरोपीचा शोध



विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931

एटापल्ली, (ता. प्र.).:- अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर एटापल्ली पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करीत एकूण ८८ जनावरे ताब्यात घेतल्याची कारवाई पहाटेच्या सुमारास केली. एटापल्ली पोलीस पथक रात्रीची गस्त घालत असताना गुरुपल्ली गावाजवळ दोन संशयित चारचाकी वाहने जनावरांची वाहतूक करताना आढळून आली. पथकाने दोन्ही वाहनांना हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकांनी वाहने काही अंतरावर नेऊन थांबविली आणि त्यानंतर वाहनातून उडी मारून जवळील जंगलातील अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे

पोलिसांनी तत्काळ वाहनांची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान टीएस-०८/युबी ५६४९ क्रमांकाच्या वाहनामध्ये अंदाजे ४० जनावरे, तर एपी-१६/टीई-१२३८ क्रमांकाच्या वाहनांमध्ये अंदाजे ४८ जनावरे आढळून आली. दोन्ही वाहनांमध्ये मिळून तब्बल ८८ जनावरे आढळून

पोलिसांचा तपास सुरू

दरम्यान, वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, जनावरांची वाहतूक कोणत्या उद्देशाने, कोठून आणि कोणाच्या सांगण्यावरून करण्यात येत होती, याचा उलगडा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पायघन पुढील तपास करीत आहेत. या कारवाईमुळे अवैध जनावरे वाहतुकीविरोधात एटापल्ली पोलिसांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचे चित्र स्पष्ट झाले आहे.

आली. पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेऊन त्यांची वाहतुकीमागील नेमका उद्देश काय होता, तसेच जनावरे कोठून आणण्यात आली आणि कुठे नेण्यात येत होती, याबाबत तपास सुरू केला. घटनेची माहिती मिळताच एटापल्लीचे ठाणेदार नागरगोजे हे घटनास्थळी दाखल झाले.

Post a Comment

0 Comments