मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
साकोली :- प्रवाशांच्या सोयीसाठी साकोली बस स्थानकाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ बसचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राजमाता जिजाऊ बसच्या माध्यमातून साकोली परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि गुणवत्तापूर्ण प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याला श्री. श्रीकांत गभने (प्रादेशिक व्यवस्थापक सनियंत्रण समिती क्र.३), स्थानकाचे आगारप्रमुख, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments