मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं.9420751809.
राजाराम :- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत राजाराम येते तीन वार्ड असून प्रत्येक वार्ड मध्ये समस्या आहेत.
मात्र पासवाडाच्या नियोजन करत असताना कुठं आवश्यक आहे त्या ठीकाणी कामे केले नाहीत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत पासून जाणाऱ्या रस्त्यावर संजू किरणा दुकानाजवळ,राईस मिल, पोलीस स्टेशनं समोर मुख्य रस्त्यावर खड्डे पडून आहेत.
वार्ड क्र. 2 मध्ये शोभा मोत्तकुरवार यांच्या घरा समोरील चौकात एक खड्डा पडून असून वारंवार तोंडी ग्रामपंचायत सचिव व सरपंचा यांना माहिती देण्यात आले, मात्र आज पर्यंत याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
आज सदर खड्डा पूर्ण करण्याची मागणी रवींद्र पंजलवार,जितेंद्र पंजलवार, सचिन मोत्तकुरवार,राकेश मोत्तकुरवार,मोनेश मोत्तकुरवार,मनोज मारगोनवार यांनी पत्रकातून केले आहे.

Post a Comment
0 Comments