मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
चंद्रपूर :- आज भाजपा प्रदेश कार्यालयात माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल धनराज केंद्रे यांच्या हस्ते आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नावाने विशेष छापील छत्र्यांचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. या छत्र्यांचे जनहितार्थ वाटप करण्यात येणार आहे.
पोलीस बांधवांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करून डीजी लोनला मान्यता मिळवून दिल्याबद्दल सुधीरभाऊ मुनगंटीवार पोलीस परिवार प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या वेळी आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी व्यक्त होतांना म्हटले की हा सन्मान केवळ माझा नसून समाजसेवेच्या विचाराचा, जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी श्री. अमोल धनराज केंद्रे तसेच सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! ही सुधीर भाऊ नी मानले जनहित, समाजहित आणि राष्ट्रहितासाठीची वाटचाल यापुढेही अधिक वेगाने आणि अधिक ताकदीने सुरू राहील, हाच दृढ संकल्प आहे! नेहमी राहील असे ही यावेळी त्यांनी म्हटले.

Post a Comment
0 Comments