Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

सर्पदंशाने इयत्ता १२वीचा विद्यार्थी दगावला.




त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953


भिवापूर : किन्हाळा येथील १२ वीतील विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (४ ऑगस्ट) घडली.


सुमित संजय कुरुटकर (१७), असे मृतक विद्यार्थ्यांचे नाव आहे. सुमित हा वडिलांसोबत घरात झोपला असताना मध्यरात्रीनंतर त्याला काहीतरी चावल्याचा भास झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिवापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपुरातील


शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. सकाळी सात वाजता नागपूर येथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुमित हा भिवापूर एज्युकेशन सोसायटीच्या बॉइज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या निधनाची माहिती मिळताच महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्यात आली. या घटनेमुळे किन्हाळा गावात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments