Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जि. प. शाळेची चौकशी करून कार्यवाहीची मागणी




 राजेंद्र झाडे 

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी 

मो 9518368177

गोंडपिपरी :- तालुक्यातील सुपगाव जिल्हा परिषद शाळेत शनिवारी (दि. 29) संतापजनक प्रकार घडला.नेहमीप्रमाणे ६३ विद्यार्थी  शाळेत पोहोचले,मात्र शाळेत शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतापाची लाट उसळली.या गंभीर प्रकारची चौकशी करून कारवाईची मागणी होत आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घतात.यासाठी 4 शिक्षक कार्यरत आहेत.मात्र शनिवारी एकही शिक्षक हजर नसल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.अखेरीस पोषण आहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शाळेचे कुलूप उघडले.बराच वेळ होऊनही शिक्षक आलेच नाही.ही गंभीर बाब वाऱ्यासारखी गावात पसरली, आणि पालकांनी शाळेत एकच गर्दी केली.मुख्याध्यापक आनंद कोंडेवार सुट्टीवर होते.त्यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक शिक्षक संतोषी पेटकर आणि मंगेश पेंदाम यांनाही शनिवारी बुट्टी मारली.मुख्याध्यापक सुट्टीवर असतांना रजा कशी मंजूर करण्यात आली ? असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.दुसरे शिक्षक दिनेश देवाळकर हे शाळा सुरू झाल्यापासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती यावेळी समोर आली.परिणामी शनिवारी शाळेतील एकही शिक्षक हजर राहिले नाही.यामुळे शाळेतील ६३ विद्यार्थी शिक्षकांविना उपस्थित असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.या घटनेबाबत सरपंच,शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी केंद्रप्रमुख तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत तक्रार केली.तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे.ही माहिती मिळताच अडेगाव येथील राठोड शिक्षकाची तात्पुरती सुपगाव शाळेत पाठविण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक कोंडेवार यांच्याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही,अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.चौकशी करून दोषींवर कारवाई कराण्याची मागणी होत आहे.

कोड :- मुख्याध्यापक आनंद कोंडेवार सुट्टीवर असल्याचे समजले,परंतु इतर दोन सहाय्यक शिक्षक सुट्टीवर असल्याची माहिती मला नाही.शिक्षकांच्या अनुपस्थितीत बाबत चौकशी करून गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार आहे.

संतोष गद्देकर,

केंद्रप्रमुख,भंगाराम तळोधी केंद्र

कोड :- शिक्षक उपस्थित नसल्याचे समजल्यावर पालक एकत्र आले.त्यासंदर्भात गटविकास अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांना माहिती दिली.तात्पुरत्या स्वरूपात एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.निष्काळजीपणा करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी. 

ईश्वर नागापुरे,अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती,सुपगाव.

Post a Comment

0 Comments