अमान कुरेशी
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सिंदेवाही, दि. ३० ऑगस्ट २०२६ : स्व. वासुदेवराव रं. इरटवार यांच्या ११व्या स्मृतिप्रीत्यर्थ इरटवार परिवार, सिंदेवाही व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे),वर्धा. यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोदय महाविद्यालय (सिनियर कॉलेज), जटालापूर रोड, सिंदेवाही येथे महा आरोग्य निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला सिंदेवाही व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तब्बल ५२४ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.विविध वैद्यकीय विभागांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिराचे उद्घाटन विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री. योगेंद्रजी जैस्वाल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला डॉ. सतीशजी चिंतावार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच श्री. भाष्करभाऊ नन्नावार, नगराध्यक्ष, नगरपंचायत सिंदेवाही, श्री. अरविंदजी जैस्वाल, बाबुरावजी परसावार, डॉ. बदनोरे, नानाजी शिंगणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली.
विविध विभागांत ५२४ रुग्णांची तपासणी
शिबिरात नेत्ररोग विभागात १०६, जनरल मेडिसिन १२१, न्यूरोलॉजी ५१, बालरोग १२, जनरल सर्जरी ५१, प्रसूती व स्त्रीरोग २०, अस्थिरोग १३०, कान-नाक-घसा (ENT) १८ आणि त्वचारोग विभागात १५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
तपासणीनंतर पुढील उपचार व वैद्यकीय सेवेसाठी १०६ रुग्णांना AVBRH रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. यामध्ये नेत्ररोग विभागातील २८, जनरल मेडिसिन २, बालरोग २, जनरल सर्जरी २३, प्रसूती व स्त्रीरोग ५, अस्थिरोग १०, ENT ३, न्यूरोलॉजी १९, मानसशास्त्र १ आणि हृदयरोग विभागातील ३ रुग्णांचा समावेश आहे.
याशिवाय शिबिरात ३२ ECG तपासण्या आणि ३६ RBS तपासण्या करण्यात आल्या. तसेच PMJY अंतर्गत १६ नोंदणी करण्यात आली असून १० कुटुंब कार्ड तयार करण्यात आले.
गरजू रुग्णांना पुढील उपचारांची सुविधा
शिबिरामध्ये निदान झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. संदर्भित रुग्णांसाठी रुग्णालयातील IPD बॅचचे वेळापत्रक ३१ ऑगस्ट २०२६ आणि २ सप्टेंबर २०२६ असे निश्चित करण्यात आले आहे.
शिबिरात विविध आजारांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. डोळे, हृदय, रक्तदाब, मधुमेह, हाडे व सांधे, त्वचा, स्त्रीरोग, बालरोग, न्यूरोलॉजी तसेच इतर आजारांची तपासणी करण्यात आली. गरजेनुसार पुढील उपचारासाठी रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडे संदर्भित करण्यात आले.
इरटवार परिवार व सहकाऱ्यांचे विशेष योगदान
या आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. संदीपजी इरटवार, पराग इरटवार, सुशांत इरटवार व समस्त इरटवार परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिजितदादा मुप्पीडवार, किशोरभाऊ भरडकर, अस्लम शेख, विलास मोगरे आणि हितेशभाऊ सूचक यांनी मोलाचे सहकार्य केले. आयोजक व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरातील नागरिकांना विविध आरोग्य तपासण्या व आवश्यक वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देणे शक्य झाले.
स्मृतिदिनाला समाजोपयोगी उपक्रमाची जोड
स्व. वासुदेवराव रं. इरटवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केवळ श्रद्धांजली अर्पण न करता b तज्ज्ञ वैद्यकीय सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेत आजाराचे निदान आणि पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले.
“सर्वांसाठी आरोग्यसेवा — निरोगी समाजासाठी एक पाऊल” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले हे महा आरोग्य शिबिर सिंदेवाही परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.

Post a Comment
0 Comments