Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

कळमना बाजारात कचरा कुजून त्याची सर्वत्र दुर्गंधी परिसरातील कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी सक्त निर्देश : महापौर श्रीमती निता ठाकरे



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016

नागपूर :- वृत्त पुढील प्रमाणे कळमना बाजारात कचरा कुजून त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. तसेच पर्यावरणाची देखील हानी होत आहे. याबद्दल नाराजी व्यक्त करीत परिसरातील कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी असे सक्त निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच लकडगंज झोनमधील कऱ्हाळे नगर, भरतवाडा परिसरातील नाग नदीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे ही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पं. जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसराची महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी  गुरुवारी (ता. ०६) पाहणी केले.  पाहणी दरम्यान मनपाचे सत्तापक्ष नेते श्री नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपिन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित,  वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, नगरसेवक श्री प्रदीप पोहणे, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. सचिन रक्षमवार कृषी उत्पन्न बाजार समिती प्र.उपसचिव श्री. रमेश चवरे, श्री. धनराज बागडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments