Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

विठ्ठल रुक्मिणी सभागृह, ब्रह्मपुरी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) द्वारा संचालित ब्रह्मपुरी येथील 'आदर्श लोक साधन केंद्राच्या' वार्षिक आढावा



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8108166961/9860020016

ब्रम्हपुरी :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की आमदार विजय भाऊ वडेट्टीवार हे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) द्वारा संचालित ब्रह्मपुरी येथील 'आदर्श लोक साधन केंद्राच्या' वार्षिक आढावा बैठकीस उपस्थित राहून . या बैठकीत ब्रह्मपुरी तालुक्यातील कार्याचा आढावा घेऊन उपस्थित बचत गटांच्या माता-भगिनींशी संवाद साधत त्यांच्या आगामी उद्योजकीय प्रवासाला अधिक गती व बळ देण्यासाठी त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. ब्रह्मपुरी मतदारसंघातील प्रत्येक माता-भगिनी स्वतःच्या पायावर उभी राहून यशस्वी उद्योजिका व्हावी, यासाठी आम्ही कायम पाठीशी असल्याचा विश्वास यावेळी दिला.

ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या आवडीनुसार विविध उद्योगांचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण, कर्ज पुरवठा आणि तयार केलेल्या उत्पादनांना प्रदर्शनांच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याचे काम आदर्श लोक साधन केंद्रामार्फत करण्यात येते. जास्तीत जास्त महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन करावेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन यावेळी केले.

याप्रसंगी आदर्श लोक साधन केंद्राच्या सर्व महिला अधिकारी, कर्मचारी आणि बचत गटांच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments