अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
तलासरी : डहाणू-तलासरी येथे आयोजित करण्यात आलेला जागतिक आदिवासी दिन उत्सव २०२६ विविध उपक्रमांनी उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, संस्था, पदाधिकारी आणि समाजबांधवांचे जागतिक आदिवासी दिन उत्सव मंच, तलासरी-डहाणू यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
यंदाच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘पारंपारिक आदिवासी सोयिनींचा सन्मान, जीवन कल्याणाचे रक्षण’ या संकल्पनेला अनुसरून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, जीवनपद्धती आणि जीवनमूल्यांचे जतन करण्याबरोबरच समाजाच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी जनजागृती करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विविध स्तरांतून मिळालेले सहकार्य, मार्गदर्शन आणि उपस्थिती यामुळे उत्सव अधिक प्रभावी आणि स्मरणीय ठरला. आयोजकांनी सांगितले की, समाजाच्या एकजुटीमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे जागतिक आदिवासी दिनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविणे शक्य झाले.
आगामी काळातही आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, हक्क-अधिकारांची जनजागृती आणि समाजकल्याणाच्या विविध उपक्रमांसाठी सर्वांचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा जागतिक आदिवासी दिन उत्सव मंच, तलासरी-डहाणू यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Post a Comment
0 Comments