Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जि. प. गायमुख (पन्हेळी) शाळेची यशाची गरुडझेप; शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे तालुक्यात निर्विवाद वर्चस्व. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात सत्कार.



 

तळा-किशोर पितळे- (प्रतिनिधी)


रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळा, गायमुख येथील विद्यार्थ्यांनी सन २०२५–२६* या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन प्रज्ञाशोध,गणित संबोध , ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा, क्रीडा, विज्ञान व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा नावलौकिक उंचावला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच शाळेत ग्रामस्थ, पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन उत्साहात सत्कार करण्यात आला.

शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता सातवीतील कु.शरण गणपत राणे*१६४ याने तालुक्यात प्रथम, कु. हर्ष रमेश पिंपळे*१६२ याने द्वितीय, तर कु. संस्कृती उमेश मोडके* १५४हिने तृतीय क्रमांक पटकावला. व शिष्यवृत्तीस पात्र झाले.तसेच इयत्ता पाचवीतील कु. मानसी प्रकाश दुरे* हिने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर* येथे निवड मिळवली.तसेच, ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत* स्वराज अमिष भौड यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले.

याशिवाय, गणित संबोध परीक्षा* इयत्ता पाचवी मध्ये चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले.मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत पहिली ते सातवीतील २४ पैकी १९ विद्यार्थी* उत्तीर्ण झाले. इयत्ता पहिलीतील कुमार स्वराज अमिष भौड* याने रायगड जिल्हा व कोकण विभागात प्रथम तसेच राज्यात सहावा क्रमांक मिळवला. इयत्ता सातवीतील हर्ष रमेश पिंपळे* याने केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.विद्यार्थीची जिध्द,चिकाटी, मेहनत,शिक्षकांचे मार्गदर्शन या मुळेच आम्ही यश संपादन करु शकलो असे विद्यार्थ्यानी मनोगतातून व्यक्त केले

या शिवाय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी १८पारितोषिके * पटकावली. विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेच्या प्रतिकृतीची निवड झाली. वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवात विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात आली.सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी गणेश राणे* होते. प्रमुख उपस्थितीत गावचे अध्यक्ष पांडुरंग ताम्हणकर*, माजी अध्यक्ष रमेश पाखड*, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेव बटावले, संदीप मोडक, सुभाष पोटले, देवजी काप, नामदेव मोडके, भीमराज जाधव, लक्ष्मण चोरगे, रमेश मोडके, ज्ञानदेव अंबावले, लक्ष्मण शिंदे, हरिश्चंद्र शिंदे, सुभाष मुकम, यासह रुचिता चाचले, रचना मोडक, करुणा शिंदे, रीमा मोडके, सोनाली जाधव, निलेश मोडके, मयुरी जाधव, सरिता कोळी* यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शाळेतील विद्यार्थी ग्रामस्थ, पालक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक अमिष  भौड, माजी मुख्याध्यापक कृष्णा कांबळे तसेच सहाय्यक शिक्षक चेतन जगताप* व राहुल उगलमुगले* यांचे नियोजन, मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत मोलाची ठरली.

Post a Comment

0 Comments