Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

शहरात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यासाठी तसेच गणेशोत्सव मंडळांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या :महापौर श्रीमती निता ठाकरे




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


नागपूर :- सविस्तर माहिती पुढील प्रमाणे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेला गणेशोत्सव यावर्षी देखील शहरात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यासाठी तसेच  गणेशोत्सव मंडळांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता मनपासह नासुप्र, पोलीस, वाहतूक  विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने घ्यावी. गणेशोत्सव मंडळांना ना हरकत प्रमाणपत्रे व परवानग्या ऑनलाईन पद्धतीने सुलभेतेने उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिले.

पुढील महिन्यात होणार्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 6) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात घेतला. यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे,  सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील, आयुक्त डॉ. विपीन, अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी व श्रीमती विनीता शाहू, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) श्री. रमेश धुमाळ, सहाय्क पोलीस आयुक्त श्री. नितीन बने, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. गणेश राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी, डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह मनपाच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच नासुप्र, धर्मादाय आयुक्त, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments