मधुकर गोंगले, गडचिरोली. मो. नं. 9420851809.
अहेरी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांतजी शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मा. अनिलजी देशमुख यांनी गडचिरोली येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी भाग्यश्रीताई आत्राम यांनी शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. तसेच नागपूर विभागीय महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा व राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सदस्या शाहीनताई हकीमयांनीही त्यांचे स्वागत केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांतजी शिंदे साहेब यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याबाबत मार्गदर्शन केले.तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे, जनतेचे प्रलंबित प्रश्न, आदिवासी बहुल भागातील समस्या आणि गडचिरोली जिल्ह्यातील संघटन बांधणी याबद्दल सकारात्मक व सविस्तर चर्चा झाली. तसेच, आदरणीय पवार साहेबांची पुरोगामी विचारधारा गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून अधिकाधिक मतदारांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली.
बैठकीदरम्यान पक्षाच्या संघटनात्मक बाबी, आगामी नियोजन तसेच विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करून तळागाळापर्यंत पक्षाचा विचार पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी श्यामजी धाईत,हरिश्चंद्रजी बोरकुटे,इंद्रपालजी गेडाम सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष,अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवासजी विरगोनवार, अहेरी न. प. नगरसेवक अमोलजी मुक्कावार, अहेरी न. प. नगरसेविका संजना मडावी,प्रमिला रामटेके महिला जिल्हाध्यक्ष,सविता चव्हाण सरचिटणीस,दीपकजी मडावी सरपंच लगाम,सुशिलजी खराती मा. सरपंच शांतिग्राम,दिवाकरजी उराडे उपसरपंच येल्ला,नरेशजी राऊत,संजयजी कोचे,आकाश पगाडे,विष्णुजी रॉय,स्वप्निलजी श्रीरामवार, विज्जूजी रंगूवार,समीरजी अरिगेला, दादा भाई,सुभाषजी आत्राम , जम्पन्ना कंबागोनी, राजेशजी बद्दी, सुमितजी मोतकूरवार, प्रभाकरजी कुसराम,राजूभाऊ नसपुरवार,रवीभाऊ पेद्दल,यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments