तळा -किशोर पितळे- (प्रतिनिधी)
तळा :- नालासोपारा- तळा -नालासोपारा थेट एस्. टी बस सेवा पूर्ववत व नियमित सुरू करण्याकरिता दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी नालासोपारा एस् टी बसस्थानक येथे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका तळा*, कुणबी युवा तळा* यांच्या नेतृत्वाखाली विविध गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC)
अध्यक्ष यशवंत शिंदे,माजी उपाध्यक्ष महादेव कुंभेकर युवा अध्यक्ष विजय घाडगे आणि युवा सरचिटणीस देविदास बांद्रे यांच्या प्रमुख उपस्थित हस्ते वाहतूक नियंत्रक घोडे साहेब व श्रीम. राऊत यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
तळा तालुक्यातील बहुसंख्य चाकरमानी हे वसई विरार, नालासोपारा,उपनगरात ठाणे अशा महानगरात नोकरीस आहेत.दर आठवडा महीन्यातून आपल्या गावी येत असतात व मोठ्या सणासुदीला काळात कुटुंबासह येत जात असतात. आणी नियमितपणे इतर प्रवासी जात असतात. सद्यस्थितीत ही बंद केल्याने प्रवाशांना मोठी कसरतकरावी लागतेतसेच खाजगी गाड्याचा आधार घेऊन अधिक भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे या बस ची नितांत गरज आहे.आणी उत्पन्न देणारी आहे."बहुजन हिताय बहुजन सुखाय" या ब्रीद वाक्याचा लाभ सार्थकी लागेल तरी कायमस्वरूपी बस सुरू करण्याची मागणीकुणबी समाजोन्नती संघ मुंबई व शाखा तळाचे वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ पवार आणि ज्येष्ठ समाज बांधव नथुराम गंभीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments