Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पद्मभूषण अण्णा हजारे यांची विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली भेट



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016

अहिल्यानगर :- राज्याचे विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची राळेगण सिद्धी येथे जाऊन भेट घेत विचारपूस केली. अण्णा हजारे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

गेल्या तीन दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आवश्यक वैद्यकीय उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते राळेगण सिद्धी येथे परतले. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.

यावेळी प्रा. शिंदे यांनी अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याची सविस्तर माहिती घेतली. तसेच त्यांनी उपस्थित सहकाऱ्यांशीही चर्चा करून उपचारांबाबत माहिती जाणून घेतली. अण्णा हजारे यांचे समाजकार्यातील योगदान प्रेरणादायी असून त्यांनी उत्तम आरोग्य लाभून पुन्हा पूर्ववत सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी लाभेश औटी, सुरेश पठारे, रोहन मांडे, जयसिंग मापारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments