✍️ भवन लिल्हारे भंडारा,गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847 /8888519894
भंडारा : तुमसर शहरालगतच्या देव्हाडी उड्डाणपुलावर शुक्रवारी दिनांक ७ ऑगस्ट २०२६) रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास मिनी मेटॅडोर आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून प्रकृती चिंताजनक आहे. अपघात घडल्याचे लक्षात येताच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अन्य वाहन चालकांनी तातडीने पोलिसांना माहिती कळविली. त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथे रेफर करण्यात आले आहे.
गंभीर जखमी दुचाकीस्वाराचे नाव वसंता बऴीराम इऴपाते असे असून तो साकोली तालुक्यातील उकारा या गावातील रहिवासी आहे. या उड्डाण पुलावर दिशादर्शक सिग्नल मागील काही दिवसांपासून बंद आहे त्यामुळे हा अपघात घडल्याचे चर्चा घटनास्थळी होती. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वाहतूक विभागाला माहिती देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष झाल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments