Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

कु.शर्वरी राईकर ने वैमानिक होऊन दैवज्ञ(सोनार) समाजाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा.



 देशातील सर्वात कमी वयाची वैमानिक.

तळा-किशोरपितळे-(प्रतिनिधी)

भारतातील अवघ्या १८ वर्षांची दैवज्ञ समाज कन्या शर्वरी राईकर हिने अमेरिकेत 'एफ.ए.ए. प्रायव्हेट पायलट सर्टिफिकेट' आणि 'इन्स्ट्रुमेंट रेटिंग' प्राप्त करून भारतातील सर्वात तरुण महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला आहे. ज्या वयात युवा पिढी स्पर्धा परीक्षा किंवा आपल्या करिअरच्या विविध पर्यायांचा विचार करत असतात त्या वयात अवघ्या १८ वर्षांच्या शर्वरी राईकर या दैवज्ञ कन्येने मुंबईतील अंधेरी येथून थेट अमेरिकेत जाऊन आपले बालपणीच वैमानिक बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे.झोपेतील स्वप्न हि स्वप्न च असतात पण उघड्या डोळ्यांनी बघीतले स्वप्न शर्वरीने जिध्द चिकाटी आत्मविश्वास च्या बळावर सिद्ध केले शर्वरी ११ वर्षांची असताना पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी विमानात बसली तेव्हाविमानाचेकॉकपिट आणि वैमानिकांचे काम पाहून अत्यंत प्रभावित झाली होती. त्याच क्षणी तिने पायलट बनण्याचा निश्चय केला होता. हेच स्वप्न उराशी बाळगून तिने थेट अमेरिकेत जाऊन कॅलिफोर्निया येथील 'ऑरेंज काउंटी फ्लाईट सेंटर' मध्ये प्रवेश घेऊन वैमानिक होण्याचे स्वप्न साकारले.तसेच दैवज्ञ समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.दैवज्ञ (सोनार) समाजातील युवा पिढीला वैमानिक होण्यासाठी शर्वरीचे उदाहरण नक्कीच प्रेरणादायी ठरेल.शर्वरी राईकर ही अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या सल्लागार समितीचे सदस्य विद्याधर रेवणकर यांच्या बहिणीची नात आहे.तीचे सर्व समाजबांधवाकडून विविधस्तरावर कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments